Ad will apear here
Next
ओएनपी रुग्णालयात विविध उपक्रम
पुणे : ‘नुकत्याच झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे महिनाभर विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. महिला दिनापर्यंत (आठ मार्च) हे उपक्रम चालणार असून, महिलांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत मोफत तपासण्या, कर्करोगाशी संबंधित वैद्यकीय चाचण्यांवर विशेष सवलत, कर्करोगाविषयी जनजागृतीपर व्याख्यान, सवलतीच्या दरात लसीकरण अशा कार्यक्रमांचा यात समावेश आहे,’ अशी माहिती ‘ओएनपी’च्या संचालिका डॉ. अमिता फडणीस यांनी दिली.

त्याचाच एक भाग म्हणून कर्करोग कसा टाळता येईल, तसेच कर्करोग लवकर लक्षात यावा यासाठी काय करता येईल याविषयी ओएनपी प्राईम रुग्णालयात १० फेब्रुवारी २०१८ रोजी कर्करोग शल्यविशारद डॉ. जॉय घोष यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, ते सर्वांसाठी मोफत आहे.

अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘शिवाजीनगरमधील ओएनपी प्राईम, पिंपळे सौदागरमधील ओएनपी लीला, गोखलेनगरमधील ओएनपी ट्यूलिप आणि शंकरशेठ रस्त्यावरील ओएनपी मीरा या रुग्णालयांमध्ये हे उपक्रम राबवले जाणार आहेत. आठ मार्चपर्यंत महिलांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात स्त्रीरोगतज्ज्ञांकडून मोफत तपासण्यांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे; तसेच तोंडाच्या कर्करोगाची तपासणी सर्वांसाठी मोफत केली जाणार आहे. मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी या चाचण्यांवर ३० टक्के, प्रयोगशाळेतील चाचण्या व रेडिओलॉजी तपासण्यांवर २५ टक्के सवलत, तर दातांच्या क्लिनिंग, पॉलिशिंग व फिलिंग उपचारांवर ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणाऱ्या लसीवर विशेष सवलत देण्यात येणार आहे.’

व्याख्यानाविषयी :
दिवस : शनिवार, १० फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : ओएनपी प्राईम रुग्णालय, शिवाजीनगर, पुणे
संपर्क : ९३२६१ ०७४६२
सुविधांचा लाभ घेण्यासाठी संपर्क : ९३७३८ १३०४०, ८०५५० २३२४७.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXIBL
Similar Posts
‘ओएनपी’ रुग्णालयातर्फे मोफत सत्राचे आयोजन पुणे : ‘गरोदर स्त्रीने काय खावे आणि काय टाळावे, गर्भवतींना व्यायामाचा कसा फायदा होतो, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत कशी काळजी घ्यावी, असे विविध प्रश्न गर्भवतींच्या मनात असतात. अशा सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे एका खास सत्राचे आयोजन केले आहे. या सत्रासाठी गरोदर
गर्भवती महिलांसाठी ‘प्रेगोदीवा’चे आयोजन पुणे : गर्भवतींच्या कौतुक सोहळ्याला आधुनिक स्वरूप देत ओएनपी रुग्णालयाने ‘प्रेगोदीवा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गर्भवती महिलांना चक्क ‘रँप वॉक’ करण्याची संधी मिळणार आहे. बाळंतपण सुरळीत व्हायच्या दृष्टीने गर्भारपणात केल्या जाणाऱ्या ‘बेली डान्स’ला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त
तीन महिन्यांच्या बालकावर अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी पुणे : केवळ तीन महिन्यांच्या आणि साडे चार किलो वजनाच्या बालकावर अत्यंत अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात येथील ‘ऑयस्टर अँड पर्ल’ (ओएनपी प्राईम) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे.
‘आयपीसी’मध्ये मोफत तपासणी शिबिर पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमार्फत २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language